
बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यामध्ये बूस्टर डोस घेणार्यांची संख्या 2 लाख 95 हजार 373 असून याची टक्केवारी 10.23 टक्के आहे. डोस घेणारा वयोगट हा 18 ते 59 आहे. जिल्ह्यात सर्वाधिक बूस्टर डोस घेणार्यांची संख्या ही आरोग्य कर्मचार्यांची आहे. एकूण 46 हजार 603 पैकी 37 हजार 723 कर्मचार्यांनी बूस्टर डोस घेतला आहे. याची टक्केवारी 80.95 टक्के आहे.
जिल्ह्यात अठरा वर्षांवरील लोकसंख्या ही 35 लाख 66 हजार आहे. जिल्ह्यात 36 लाख 44 हजार 225 (102 टक्के) लोकांंनी पहिला तर 37 लाख 27 हजार 433 लोकांंनी (104.53 टक्के) दुसरा डोस घेतला आहे. पंधरा ते सतरा वयोगटातील मुलांना 2 लाख 32 हजार 709 मुलांना (94.18ट क्के) डोस देण्यात आला आहे. बारा ते चौदा वयोगटातील 1 लाख 87 हजार 749 मुलाना (116.43 टक्के) डोस देण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडे सध्या 42 हजार 990 डोस शिल्लक आहेत. यामध्ये कोव्हिशिल्ड 5 हजार 700, कोव्हॅक्सीन 36 हजार 490 तर कोर्बीव्हॅक्स 800 डोस शिल्लक आहे.
आरोग्य कर्मचारी 37,723 80.95
कोरोना योद्ध 83,174 66.30
18 ते 59 वयोगट 28,86,918 10.23
60 वर्षावरील 6,03,814 46.82