बेळगाव : अनगोळचा मटकाबुकी वर्षासाठी तडीपार | पुढारी

बेळगाव : अनगोळचा मटकाबुकी वर्षासाठी तडीपार

बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा मटकाप्रकरणी सातत्याने कारवाई करूनही सुधारणा न झालेल्या तरुणाला एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. परशुराम बाबू मेत्री (वय 40, रा. अनगोळ) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रवींद्र गडादी यांनी हा आदेश बजावला आहे.

परशुराम मटका व्यवसायात गुंतला होता. कर्नाटक पोलिस कायदा 78(3) अंतर्गत त्याच्यावर सात गुन्हे दाखल आहेत. यापैकी 4 प्रकरणांमध्ये न्यायालयाने त्याला शिक्षा देखील सुनावली आहे. तरीही तो मटका व्यवसायातून बाहेर न पडता त्याने पुन्हा तोच बेकायदेशीर मार्ग अवलंबला होता. त्याला सातत्याने सूचना करूनही त्याच्यामध्ये काहीही बदल होत नव्हता. त्यामुळे त्याला 19 सप्टेंबर 2022 ते 18 सप्टेंबर 2023 या एक वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार करण्याचा आदेश डीसीपी गडादी यांनी बजावला आहे.

मटका व्यवसाय तसेच अन्य बेकायदेशीर धंद्यात गुंतलेल्या अन्य गुन्हेगारांनीही वेळीच वर्तन सुधारावे; अन्यथा त्यांच्यावरही अशीच कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिस आयुक्तालयाने दिला आहे.

Back to top button