बंगळूर : सिध्दरामय्यांविरोधात भाजपचे लोकायुक्तास्त्र | पुढारी

बंगळूर : सिध्दरामय्यांविरोधात भाजपचे लोकायुक्तास्त्र

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या विरोधात सत्ताधारी भाजपने लोकायुक्त अस्त्राचा वापर करण्याचे नियोजन केले आहे. सिध्दरामय्या मुख्यमंत्री असताना भेट म्हणून देण्यात आलेल्या महागड्या मनगटी घड्याळ प्रकरणात तसेच ते अर्कावती पुनर्विकास प्रकरणासंबंधीतील आरोपांची चौकशी करण्यासाठी लोकायुक्तांकडे तक्रार केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सिध्दरामय्यांविरोधात लोकायुक्तांकडे 29 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र एफआरआय दाखल झालेला नाही, असे विधान परिषद सदस्य व भाजपचे सचिव एम.रविकुमार यांनी सांगितले. भेट म्हणून देण्यात आलेल्या महागड्या घड्याळामागचे गुपित आपल्याला समजलेले नाही. वादानंतर राज्याच्या खजान्याकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. मात्र प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागला नाही.

प्रकरण दडपण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. घड्याळ कुणी भेट दिले, हे स्पष्ट व्हावे. या मागे कोणते कारण आहे, असे अनेक प्रश्न उनुत्तरीत आहेत. याबाबतची स्पष्ट चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के शिवकुमार यांच्याविरोधात सूर्यरयत योजनेची निविदा प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात ही काही आमदार ठराव मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Back to top button