कर्नाटकचे वन आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांचे निधन

कर्नाटकचे वन आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांचे निधन
Published on
Updated on

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा वन आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती (वय ६१) यांचे (मंगळवार) रात्री निधन झाले. त्यांना घरात हृदयविकाराचा झटका आला होता. रात्री 10.30 च्या सुमारास उमेश कत्ती हृदयविकाराचा झटका आल्‍यावर कोसळले होते. यानंतर तात्‍काळ त्‍यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

बंगळूरच्या डॉलर्स कॉलनीत उमेश कत्ती यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना एम.एस. रामय्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार करण्यात आले. इमर्जन्सी युनिटमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते. हे वृत्त समजताच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि अनेक मंत्र्यांनी रुग्णालयात धाव घेतली. कत्ती यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यातच त्यांचे रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्‍यांचे निधन झाले.

ते हुक्केरी मतदारसंघातून आठ वेळा निवडून आलेले ते ज्येष्ठ आमदार होते. 1983 मध्ये त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर, त्यांनी अगदी लहान वयात पोटनिवडणूक जिंकली आणि ते आमदार म्हणून निवडून आले होते. ते स्वतंत्र उत्तर कर्नाटकचे पुरस्कर्ते होते.

हेही वाचा :  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news