बेळगाव : मंगलमूर्तीचे जल्‍लोषी स्वागत

बेळगाव : मंगलमूर्तीचे जल्‍लोषी स्वागत
Published on
Updated on

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  'गणपती बाप्पा मोरया', 'एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार', अशा जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात बुधवारी शहर परिसरात गणरायाचे जल्‍लोषात आगमन झाले. गत दोन वर्षांनंतर यंदा भाविकांत मोठा उत्साह दिसून आला. सकाळच्या सत्रात घरगुती श्री मूर्ती नेण्यासाठी आबालवृद्धांची मोठी लगबग सुरू होती. दुपारनंतर सार्वजनिक मंडळाच्या श्री गणेशमूर्ती आणण्यात मंडळाचे कार्यकर्ते मग्‍न होते. बुधवारी सायंकाळच्या सत्रात सुमारे अर्धा तास पावसाने हजेरी लावली. तरी रात्री उशिरापर्यंत शहर परिसरातील 400 हून अधिक सार्वजनिक मंडळांनी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली. पावसामुळे सायंकाळी श्री मूर्ती प्लास्टिक कव्हरने झाकून नेण्यात येत होत्या. पावसामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. काही मंडळांच्या श्री मूर्तींचे पावसामुळेे उशिरा आगमन झाले.

पुणे, मुंबईनंतर बेळगावच्या गणेशोत्सवाची ख्याती आहे. येथील गणेशोत्सव म्हणजे मोठा आनंद सोहळा. काही मंडळांनी दोन दिवस अगोदरच श्री मूर्ती आणल्या होत्या. यंदा निर्बंधमुक्‍त गणेशोत्सवामुळे भाविकांत उत्साही वातावरण आहे. गणेश मूर्ती नेण्यासाठी बुधवारी दिवसभर शहरातील रस्त्यांवर वर्दळ सुरू होती. सर्वत्र चैतन्यमय वातावरण असून मंडळांचे मंडप रोषणाईने उजळून निघाले आहेत.

शहरात, उपनगरात सुमारे 400 हून अधिक मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. बुधवारी सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेत तसेच दुपारी 2 ते रात्री 9 पर्यंत सार्वजनिक मंडळांनी मूर्ती नेल्या. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे सामाजिक उपक्रम राबवण्यावर भर द्यावा, असे सर्वच मंडळांना आवाहन करण्यात आले. महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडूसकर, कार्याध्यक्ष रणजित च्हाण पाटील, स्वागताध्यक्ष मदन बामणे, महादेव पाटील यांनी विविध मंडळांना भेट देऊन मार्गदर्शन केले. पोलिसांकडून सर्वच गर्दीच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे. दिवसभरात कोठे अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र शांततेत आगमन सोहळा पार पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news