बेळगाव : उद्योग देण्याच्या आमिषाने फसवणूक | पुढारी

बेळगाव : उद्योग देण्याच्या आमिषाने फसवणूक

हुक्केरी ः पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मदमक्कनाळ गावात उद्योग देण्याचे आमिष दाखवून दोन महिलांनी 13 लाख रुपयांना फसवणूक केल्याचा आरोप करून गावातील महिलांनी हुक्केरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दोड्डव्वा बडिगेर व विजयलक्ष्मी बडिगेर यांनी महिलांना बटण तयार करण्याचा उद्योग देण्याचे सांगून अ‍ॅडव्हान्स रक्कम घेतली. सदर रक्कम दोन महिन्यानंतर परत करण्यात येईल, असे सांगून प्रत्येक महिलेकडून 3500 रुपये व बटण तयार करण्यासाठी मशीनला 35 हजार रुपये असे अंदाजे 250 महिलांकडून 13 लाख रुपये घेऊन फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सदर रकमेबाबत विचारणा केली असता तुमची रक्कम निपाणीच्या व्यक्तीला दिली आहे. रक्कम घेतलेली व्यक्ती पैसे घेऊन फरार झाली आहे. तुम्हाला पैसे हवे असल्यास त्यांना विचारा अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे. आमची रक्कम आम्हाला परत मिळावी, अशी मागणी महिलांनी फिर्यादीत केली आहे.

यावेळी शोभा तुरमरी, सुरेखा पाटील, गंगव्वा पाटील, लक्ष्मी पाटील, गंगव्वा भाविमनी, महादेवी भाविमनी, शांता पाटी, गंगव्वा कोष्टी, अक्कव्वा हिरेमठ, शिवानंद हिरेमठ आदी उपस्थित होत्या.

वाचा : 

Back to top button