बेळगाव : गोकुळाष्टमी उत्साहात, आज दहीहंडी | पुढारी

बेळगाव : गोकुळाष्टमी उत्साहात, आज दहीहंडी

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  शहर परिसरात गुरुवारी गोकुळाष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. शुक्रवार दि. 19 रोजी दहीहंडी साजरी करण्यासाठी शहर, उपनगरात विविध ठिकाणी मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. गुरुवारी शहरातील बहुतांश घरी कृष्णाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजन करण्यात आले. श्रीकृष्णाची वेशभूषा करून गोकुळाष्टमी उत्सवात बालचमूही सहभागी झाला होता. शहर परिसरातील विविध कृष्ण मंदिरातही कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम झाले.

शुक्रवार दि. 19 रोजी होणार्‍या दहीहंडीसाठी विविध मंडळाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. गवळी गल्ली, टिळकवाडी तसेच येथील मराठा लाईट इन्फंट्री सेंटरमध्ये दहीहंडी साजरी करण्याची परंपरा आहे. गत दोन वर्षे कोरोनामुळे हा उत्सव झाला नाही. मात्र यंदा प्रशासनाने कोरोनाबाबत निर्बंध हटवल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. गवळी गल्ली येथे दहीहंडी कार्यक्रमाला अनेक वर्षांची परंपरा आहे.

Back to top button