सावरकर-टीपू सुलतानच्या पोस्टरवरून वाद; कर्नाटकमधील शिवमोगा शहरात जमावबंदी लागू | पुढारी

सावरकर-टीपू सुलतानच्या पोस्टरवरून वाद; कर्नाटकमधील शिवमोगा शहरात जमावबंदी लागू

बंगळूर; वृत्तसंस्था : कर्नाटकातील शिवमोगा शहरात दोन गटात सोमवारी दंगल झाली. येथील अमीर अहमद चौकात हिंदू संघटनांच्या लोकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पोस्टर लावले, त्याला मुस्लिम संघटनांच्या लोकांनी विरोध केला आणि ते टिपू सुलतान सेनेचे झेंडे घेऊन पोहोचले. यानंतर दोन्ही गटांत हाणामारी झाली पोलिसांना अखेर लाठीमार करावा लागला. वादानंतर सावरकरांचे पोस्टरही हटविण्यात आले. तणावाची परिस्थिती पाहाता पोलिसांनी संपूर्ण शहरात 144 कलम लागू केले आहे. मोठ्या संख्येने पोलिस दलही तैनात करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार एकावर चाकूने वारही झाले आहेत. चाकूहल्ल्याची घटना याच वादावरून झाली किंवा कसे, त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. जखमीवर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले. मंगळूर येथील सुरतकल चौकात लावण्यात आलेले सावरकरांचे पोस्टरही पोलिसांनी हटविल्याचे वृत्त आहे. शिवमोगा येथे याआधी 23 जून रोजी भाजप नेते मोहम्मद अनवर यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती.

Back to top button