बेळगाव : मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा | पुढारी

बेळगाव : मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहर, तालुका आणि खानापूर तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांना व अंगणवाडी केंद्रांना सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतची घोषणा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे.

तीन दिवसांपासून बेळगाव आणि खानापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बेळगाव तालुका शहरातील खानापूर तालुक्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी मोहरमची सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांना दोन दिवस सुट्टी मिळणार आहे. बुधवारी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना शाळेला जावे लागणार आहे. दरम्यान क्लब रोडवर बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे आज (सोमवारी) या भागातील 11 शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे.

Back to top button