बेळगाव : बस पुलावरून उलटून १५ प्रवासी जखमी | पुढारी

बेळगाव : बस पुलावरून उलटून १५ प्रवासी जखमी

संबरगी; पुढारी वृत्तसेवा : अथणी- सावळगी बसचे स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे बस पुलावरून पलटी होऊन सुमारे 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. कोकटनूर- यल्‍लमवाडी रस्त्यावर ही घटना घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी, अथणी- सावळगी बस पुलावरून येत असताना स्टेअरिंग लॉक होऊन बस पुलावरून कोसळली. बसमध्ये 25 प्रवासी होते. यामधील पंधरा प्रवासी जखमी झाले.

चालक जगदीश बबलेश्वर व वाहक परमेश्वर ऐगळी यांच्या प्रसंगावधानुमळे मोठा अनर्थ टळला. जखमींवर कोकटनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करून सोडयात आले. याबाबत ऐगळी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

Back to top button