बेळगाव : खड्ड्यात स्वत:चाच फोटो लावून वाहिली श्रद्धांजली | पुढारी

बेळगाव : खड्ड्यात स्वत:चाच फोटो लावून वाहिली श्रद्धांजली

बेळगाव;  पुढारी वृत्तसेवा :  स्मार्टसिटी योजनेकडून शेकडो कोटी रुपये खर्चूनही रस्त्यांची दुरवस्था झाल्याचा निषेध करण्यासाठी वरुण कारखानीस या तरुणाने रस्त्यावरील खड्ड्यात आपलाच फोटो ठेवून श्रद्धांजली वाहिली.

गांधीगिरी पद्धतीने करण्या आलेल्या या आंदोलनाची चर्चा शहरात रंगली होती.

स्मार्टसिटी योजनेतून शहरात रस्ते करण्यात आले आहेत. काही रस्ते अपूर्ण आहेत. यामुळे अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले असून अपघाताचा धोका कायम आहे. याचा निषेध करण्यासाठी वरून कारखानीस या तरुणाने रविवारी आपला फोटो दुसर्‍या गेटजवळील एका रस्त्याच्या खड्ड्यामध्ये ठेवून त्याला हार घातला व अगरबत्तीही लावली.

कारखानीस याने यापूर्वी रस्त्यावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ अभिनव पद्धतीने अनेक आंदोलने करुन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

Back to top button