बेळगाव : गोकाक पोलिसांकडून तीन चोरट्यांना अटक | पुढारी

बेळगाव : गोकाक पोलिसांकडून तीन चोरट्यांना अटक

गोकाक; पुढारी वृत्तसेवा :  गोकाक येथे अनेक दिवसांपासून धूम स्टाईलने महिलांच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसूत्र, दुचाकी चोरीचा धुमाकूळ घालणार्‍या तीन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली.त्यांच्याकडून 50 ग्रॅम सोन्याचे दोन मंगळसूत्र व दोन दुचाकी जप्‍त करण्यात आल्या.

अनेक दिवसांपासून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व मोटारसायकल चोरी प्रकारामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. या प्रकरणी गोकाकचे डीवायएसपी मनोजकुमार नाईक, सीपीआय गोपाळ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गोकाक शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक घोरी यांच्या नेतृत्त्वाखाली विशेष पथकाने तपास केला.
गोकाक-योगीकोळ्ळ मार्गावर मोटारसायकलवर बसलेल्या युवकांना संशयाने पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक चौकशी केल्यानंतर ते चोरटे असल्याचे आढळले.

त्यांनी गोकाक येथे फेब्रुवारीत गुल्‍ल यांच्या दुकान मार्गावर आणि विद्यानगर मार्गावरील बसवमंडप येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी केले होते. त्यांच्याकडून 50 ग्रॅमचे 2.75 लाखांचे दोन मंगळसूत्र जप्त केले. तसेच 60 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी असे एकूण 3 लाख 55 हजारांचा ऐवज जप्त केला. चोरट्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. रमेश हडपद, बी. व्ही. नरली, सुरेश हुरगार, मल्‍लाप्पा गिडगेरी, सचिन होळेप्पागोळ, विठ्ठल नाईक, मुरनाळे यांनी ही कारवाई केली.

Back to top button