बेळगाव : अलमट्टीतून विसर्ग आता 1 लाख 12 हजार क्युसेकवर | पुढारी

बेळगाव : अलमट्टीतून विसर्ग आता 1 लाख 12 हजार क्युसेकवर

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  कृष्णा नदीच्या पातळीत घट झाल्यामुळे अलमट्टी धरणातून आज मंगळवारी पुन्हा सव्वा लाखावरून पाण्याचा विसर्ग 1 लाख 12 हजार करण्यात आला आहे.

गेले चार दिवस या धरणातून दीड ते सव्वा लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता, मात्र आता कृष्णा नदीच्या पातळीत घट झाल्यामुळे आणि पावसाचा जोर ओसरल्यामुळे पुन्हा 1 लाख 12 हजार क्युसेक विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. या धरणाची क्षमता 123.1 टीएमसी असून सध्या या धरणामध्ये 87.227 टीएमसी म्हणजे 70.91 टक्के पाणी साठा आहे.

बेळगाव जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्ंयात वाढ झाली. मलप्रभा धरणातील पाणीसाठा 22.321 टीएमसी झााल असून, या धरणाची क्षमता 37.731 टीएमसी आहे. घटप्रभा धरणातील पाणीसाठा 29.952 टीएमसी झाला असून, या धरणाची क्षमता 51 टीएमसी आहे. मार्कंडेय धरणातील पाणीसाठा 2.497 टीएमसी असून, या धरणाची क्षमता 3.996 टीएमसी आहे. राजापूर (म्हैसाळ ता. मिरज) धरणातून बेळगाव जिल्ह्यात पाण्याची आवक 99हजार 875 क्युसेक, दुधगंगामधून 27 हजार 120 तर कल्लोळ धरणातून 1 लाख 26हजार 995 क्युसेक आवक झाली.

Back to top button