चिकोडी : 18 लाखांची दारू जप्‍त, एकाला अटक | पुढारी

चिकोडी : 18 लाखांची दारू जप्‍त, एकाला अटक

चिकोडी; पुढारी वृत्तसेवा :  गोव्याहून बेकायदेशीरपणे वाहतूक करत असलेली 18 लाख 30 हजार किंमतीची सुमारे 2455 लिटर दारूसह ट्रक चालकाला चिकोडी अबकारी खात्याने ताब्यात घेतले. बसवराज दिंडलकुंपी (वय 36, रा खणगाव, ता.बेळगाव) असे ट्रकचालकाचे नाव आहे.

गोव्याहून आंबोलीमार्गे महाराष्ट्रकडे दारूची वाहतूक कीत असताना हुक्केरी तालुक्यातील कमतनूर क्रॉसनजीक छापा टाकून अबकारी पोलिसांनी बसवराजला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 2455 लिटरचे 280 दारू बॉक्स व आयशर वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती चिकोडी अबकारी उपायुक्त जगदीश कुलकर्णी यांनी दिली.

बेळगाव अबकारी अप्पर आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, अबकारी जॉइंट आयुक्त फिरोज खान किल्लेदार व चिकोडी उपायुक्त जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चिकोडी उपविभाग अबकारी उपअधीक्षक अनिलकुमार नंदेश्वर व प्रवीण रंगूसुभे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. या कारवाईत अबकारी निरीक्षक लिंगराज के., विजयकुमार मेळवंकी, श्रीशैल गुडमे, उपनिरीक्षक हसनसाब नदाफ, महाबल उगार शंकरानंद मुदोळी, कर्मचारी राजू अंबारी, फय्याज सय्यद आदींनी भाग घेतला.

Back to top button