रामतीर्थनगरला चार लाखांची घरफोडी | पुढारी

रामतीर्थनगरला चार लाखांची घरफोडी

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
घर बंद करून सर्व कुटुंबीय फिरायला गेलेले असताना चोरट्यांनी घर फोडले. कपाटातील आठ तोळे दागिन्यांसह 25 हजारांची रोकड चोरीला गेली आहे. रामतीर्थनगर येथे तीन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची सोमवारी माळमारुती पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

सुनीता सतीश नूरण्णवर (रा. रामतीर्थनगर) यांनी सोमवारी पोलिसांत फिर्याद दिली. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, चार दिवसांपूर्वी नूरण्णवर कुटुंबीय फिरण्यासाठी गेले होतेे. 1 जुलै रोजी चोरट्यांनी त्यांच्या समोरील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातील आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व 25 हजारांची रोकड लांबविली. घर उघडे पाहून शेजार्‍यांनी ही माहिती फोनद्वारे नूरण्णवर यांना दिली. परंतु ते दूरवर असल्याने पर्यटन संपवून ते सोमवारी बेळगावला परतले. त्यांनी घरात पाहणी केल्यानंतर आठ तोळे दागिने व काही रोकड नसल्याचे आढळून आले. यानंतर त्यांनी माळमारुती पोलिसांत जाऊन याबाबतची फिर्याद नोंदवली. माळमारुती ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. श्‍वानपथक व ठसेतज्ज्ञांना बोलावून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु ठोस काही हाती लागले नाही. माळमारुती पोलिसांत नोंद झाली असून, निरीक्षक सुनील पाटील तपास करत आहेत.

हेही वाचा

Back to top button