बेळगाव : वीज दरवाढीचा पुन्हा शॉक? | पुढारी

बेळगाव : वीज दरवाढीचा पुन्हा शॉक?

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा: कर्नाटक विद्युत नियामक मंडळाने 1 जुलै ते डिसेंबर अखेरीस राज्यात प्रति युनिट 19 ते 31 पैसे दरवाढ करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवला आहे. एप्रिल महिन्यात दरवाढ करण्यात आली होती. त्यामुळे दरवाढ होऊन दोन महिने होण्याआधी ग्राहकांना आणखी वीज दरवाढीचा झटका मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

कोळशाच्या किमतीत 5 टक्के वाढ झाल्याचे कारण देण्यात येत आहे. ऑक्टोबर 2021 ते मार्च 2022 पर्यंत कोळशाच्या किमतीत 5 टक्के वाढ झाली. याची भरपाई करण्यासाठी 1 जून ते 31 डिसेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी वीजदरवाढ अटळ आहे, अशी माहिती देण्यात येत आहे. वीजदरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र राज्य सरकारने याला परवानगी दिलेली नाही.

हेही वाचलंत का? 

विजेच्या दरात वाढ करणार नाही. याबाबत चुकीचा संदेश पसरवण्यात येत आहे. तसा कोणताही प्रस्ताव सरकारपुढे नाही. वर्षातून केवळ एकदाच दरवाढ केली जाणार आहे. अशा अफवांवर विश्वास
ठेवू नये.
– व्ही. सुनीलकुमार ऊर्जामंत्री

Back to top button