बेळगाव : मारीहाळला खुनी हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल | पुढारी

बेळगाव : मारीहाळला खुनी हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा: मारीहाळ येथे एकावर खुनी हल्ला झाल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी दोघांविरोधात खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. राजेसाब हनीफ मुल्ला (रा. मारीहाळ) हे जखमी झाले आहेत.

दिलेल्या फिर्यादीनुसार बसवराज भीमशी शितीमणी व महेश बसवराज नगारी (दोघेही रा. मारीहाळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वी बसवराज व राजेसाब यांच्यात क्षुल्लक कारणातून वाद झाला होता. याचा राग बसवराजला होता. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास राजेसाब गॅरेजकडे जात असताना बसवराजने त्यांना हायस्कूलजवळ अडवले. त्यांच्या पोटावर जांबियाने वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो वार चुकवल्याने राजेसाब यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

यावेळी महेशनेही त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मारीहाळ पोलिसांत नोंद झाली असून निरीक्षक महांतेश बसापुरे तपास करत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button