बेळगाव : जागतिक स्तरावर ‘योग’ दिनाला मान्यता; नरेंद्र मोदी म्हैसूरमधील योग दिनात सहभागी | पुढारी

बेळगाव : जागतिक स्तरावर ‘योग’ दिनाला मान्यता; नरेंद्र मोदी म्हैसूरमधील योग दिनात सहभागी

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : याआधी योगासने केवळ अध्यात्मिक स्थळ किंवा पारंपरिक ठिकाणी केले जात होते. आज याचे महत्त्व संपूर्ण जगाने जाणले आहे. आरोग्याचे रहस्य असणारी योग पद्धत आज आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य झाल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त म्हैसूर येथील राजवाड्याच्या मैदानावर आयोजित योगदिन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी पंतप्रधान माेदी म्हणाले की, सर्वांशी संपर्क साधण्याचे काम योग करत आहे. संपूर्ण देशाचा संपर्क यामुळे होत आहे. मानसिक तणावासह आरोग्याच्या अनेक समस्यांवर योगाद्वारे मात करता येते. आजच्या दिवशी ७५ शहरात, ऐतिहासिक स्थळी, सांस्कृतिक केंद्रांमध्ये योग दिन साजरा करण्यात आला आहे.

तसेच योगासनांचे महत्त्व प्रत्येकाने जाणले पाहिजे. जागतिक स्तरावर याचे महत्त्व वाढत असल्याचेही मोदी यांनी सांगितले. हा आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन असून, सुमारे १५ हजार योगपटूंसमवेत त्यांनी योगासने केली आहेत. सांस्कृतिक नगरी असणार्‍या म्हैसूरचे वैशिष्ट्य वेगळे आहे. जागतिक स्तरावर म्हैसूर नगरीचे नाव मोठे असून, भविष्यात या शहराचे नाव आणखी मोठे होईल, असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचलंत का? 

Back to top button