बेळगाव : बिम्सच्या विद्यार्थ्यांत मारामारी, 12 निलंबित | पुढारी

बेळगाव : बिम्सच्या विद्यार्थ्यांत मारामारी, 12 निलंबित

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बिम्स वैद्यकीय महाविद्यालयातील तिसर्‍या वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये चार दिवसापूंर्वी निवडणुकीवरुन वाद होऊन मारामारी झाली होती. याप्रकरणी बारा विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती बिम्सचे प्रशासक आणि प्रादेशिक आयुक्त आमलान आदित्य बिस्वास यांनी पत्रकारांना दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, बिम्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या तिसर्‍या वर्षाच्या वर्गाची प्रतिनिधींची निवडणूक झाली होती. यावरुन विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद झाला होता. त्यानंतर चार दिवसापूर्वी सायंकाळी महाविद्यालयाच्या आवारात दोन गटात मारामारी झाली. यामध्ये कात्री वापरण्यात आल्याने एका विद्यार्थ्याच्या चेहर्‍यावर जखम झाली आहे.

याप्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, बारा विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दोषी विद्यार्थ्यांवर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची चौकशी सुरु आहे. त्यानुसार पुढील कारवाई पोलिस करणार आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button