बेळगाव : हेब्बाळजवळ दुचाकी अपघातात दोन तरुण ठार | पुढारी

बेळगाव : हेब्बाळजवळ दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

खानापूर : पुढारी वृत्तसेवा: भरधाव दुचाकीची झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाले. खानापूर-नंदगड मार्गावरील हेब्बाळजवळील वळणावर शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला.

सुरेश नागाप्पा तोपिनकट्टीकर (वय 24, रा. गणेबैल, ता. खानापूर) हा तरुण जागीच ठार झाला. तर त्याचा मित्र गणेश विठ्ठल बामणे (वय 21, रा. रायापूर नंदगड) याचा दवाखान्यात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. परशराम महादेव गुरव (वय 15, रा. गणेबैल) हा तरुण जखमी झाला आहे.

गणेबैल येथून दुपारी दुचाकीवरून दोघेजण नंदगडला कामानिमित्त गेले होते. सायंकाळी काम आटोपून ते खानापूरच्या दिशेने परत येत असताना हेब्बाळजवळील धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने त्यांच्या दुचाकीने झाडाला धडक दिली. यावेळी सुरेश याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. गणेशला रुग्णवाहिकेतून दवाखान्यात नेत असताना खानापूर शहराजवळ त्याची प्राणज्योत मालवली.

जखमी परशराम याच्यावर बेळगाव येथील खाजगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. नंदगड पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button