बेळगाव : हिरेकुडी येथे बसव जयंती मिरवणुकीवेळी पोलिस वाहनावर दगडफेक | पुढारी

बेळगाव : हिरेकुडी येथे बसव जयंती मिरवणुकीवेळी पोलिस वाहनावर दगडफेक

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बसव जयंतीनिमित्त रात्री उशिरापर्यंत डीजे साऊंडच्या निनादात नाचणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या वाहनावर समाजकंटकानी दगडफेक केल्याची घटना चिकोडी तालुक्यातील हिरेकुडी येथे घडली आहे.

याबद्दल अधिक माहिती अशी की, चिकोडी तालुक्यातील हिरेकुडी येथे बसव जयंतीनिमित्त डीजे लावून मिरवणूक सुरू होती. यावेळी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनी तरुणांना उशीर झाला असून मिरवणूक लवकर पुढे हलवून संपविण्यास सांगत होते.

याचवेळी मागे असलेल्या समाजकंटकानी पोलीस वाहनावर दगफेक करून पसार झाले. यात वाहनाचे नुकसान झाले. यावेळी उपस्थित पीएसआय यमनाप्पा मांग व त्यांच्या सहकाऱ्यांनी युवकांचा शोध घेतला. यामुळे काही काळ तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. पण पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली. घटनास्थळी चिकोडीचे डीवायएसपी बसवराज यलीगार यांनी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी चिकोडी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर दगडफेक केलेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

Back to top button