कर्नाटकात पुन्हा मास्कसक्‍ती; कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती | पुढारी

कर्नाटकात पुन्हा मास्कसक्‍ती; कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा :  सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती करण्यात आली आहे. शिवाय रस्त्यांवर थुंकण्यास मनाई केली असून सामाजिक अंतराचे पालन करण्याचा आदेश राज्य सरकारने बजावला आहे.

कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या शक्यतेने शासनाने खबरदारी घेतली आहे. याआधी कोरोनाची तिसरी लाट आली होती. संसर्ग कमी झाल्यानंतर गेल्या 28 फेब्रुवारी रोजी निर्बंध मागे घेण्यात आले होते. पण, गेल्या काही दिवसांपासून दिल्ली, हरियाणा, तमिळनाडूमध्ये संसर्ग वाढला आहे. कर्नाटकातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ही कोरोनाची चौथी लाट असू शकते. त्या पार्श्‍वभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या कोरोना तांत्रिक सल्लागार समिती आणि काही मंत्र्यांच्या बैठकीनंतर याबाबतचा आदेश जारी करण्यात आला.

आरोग्यमंत्र्यांची पत्रकार परिषद

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने खबरदारी घेतली असून मार्गसूची जारी केली आहे. गर्दीच्या ठिकाणी आणि सभागृहातील कार्यक्रमांमध्ये मास्कसक्‍ती, सामाजिक अंतर पाळण्याची सूचना आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या गृह कार्यालयात कोरोनाविषयी आयोजित बैठकीत त्यांनी भाग घेतला. यावेळी महसूल मंत्री आर. अशोक, तांत्रिक सल्लागार समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर डॉ. के. सुधाकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लवकरच सरकारकडून मार्गसूची जारी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चौथ्या लाटेचा सामना करण्यासाठी कठोर उपाय लागू करण्यात येत आहेत. सध्या गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्ती केली आहे. मास्क न वापरणार्‍यांना दंड केला जाणार नाही. पण, लोकांनी नियमाचे गांभीर्याने पालन केले नाही तर दंड आकारला जाणार असल्याचे डॉ. सुधाकर यांनी स्पष्ट केले. बंगळूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रा 1.9 टक्के कोरोना प्रकरणे आढळली आहेत. याविषयी आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. आवश्यकतेवेळी रुग्णांवर अधिक उपचार केले पान 8 वर

जाणार आहेत. विश्‍व आरोग्य संस्थेने लस न घेतलेल्यांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रत्येकाने कोरोनाचे दोन डोस सक्तीने घ्यावेत. तिसरा डोस घेण्यासाठी पात्र असणार्‍यांनी तो घेण्याचे आवाहन डॉ. सुधाकर यांनी केले.

दक्षिण कोरिया, थायलंड आणि जपानमध्ये दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे या देशांतून येणार्या हवाई प्रवाशांवर नजर ठेवण्यात आली आहे. त्यांंच्या संपर्कात असणारे आणि इतर प्रवाशांना ट्रॅक केले जात आहे. त्यांचे टेलि मॉनिटरिंगही केले जात आहे.
राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात आणि तालुका रुग्णालयांमध्ये औषधांची कमतरता नाही. स्थानिक आरोग्याधिकार्यांच्या खात्यांर औषधे खरेदीसाठी रक्कम जमा केली आहे. या रकमेचा वापर औषध खरेदीसाठी करता येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

रोज 10 हजार चाचण्या…

राज्यात रोज 10 हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. केंद सरकारच्या मार्गसूचीनुसार रोग लक्षणे असणार्‍यांची चाचणी केली जात आहे. 27 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर पुढील उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.

हेही वाचलंत का? 

Back to top button