निपाणी येथे जेवणाच्या निमंत्रणावरून मित्रांवर चाकूहल्ला ; दोघांना अटक | पुढारी

निपाणी येथे जेवणाच्या निमंत्रणावरून मित्रांवर चाकूहल्ला ; दोघांना अटक

निपाणी ; पुढारी वृत्तसेवा : शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी चौक येथे जेवणाचे निमंत्रण न दिल्याच्या कारणावरून मित्रावर चाकु हल्ला करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली. यावेळी झालेल्या हल्ल्यात सागर यशवंत रेडेकर (वय ३०) रा. कामगार चौक, निपाणी हा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज (दि.२७) शनिवारी रात्री घडली.
निशांत राजू पवार (वय २२ रा. न्हावी गल्ली व विजय व्यंकाप्पा गोंधळी (वय १९) पंतनगर अशी दोघा अटक केलेल्यांची नावे आहेत.

रविवारी रात्री उशिरा हल्ला करणाऱ्या ओमकार रमेश निकम (वय २४) रा. कामगार चौक व अमोल आतकर (वय २१) रा. निपाणी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

याबाबतची अधिक माहिती अशी की ओमकार निकम व सागर रेडेकर हे दोघे जण एकाच गल्लीमध्ये राहतात. नवरात्र काळात मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या जेवणासाठी सागर याने ओमकारला निमंत्रण दिले नव्हते. त्यामुळे मध्यंतरी सागर व ओमकार यांच्यात वाद झाला होता. हा वाद पोलिसांत मिटविण्यात आला होता.

दरम्यान त्यानंतर दोघांचे एकमेकांशी बोलणे नव्हते. शनिवारी रात्री सागर हा शिवाजी चौक येथे थांबला असता ओमकार याने आपले मित्र निशांत, विजय, अमोल या तिघांसमवेत सागरवर हल्ला केला. यावेळी सागर भीतीने आपल्या घरात गेला. यावेळी त्याचा पाठलाग करीत चौघांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी नागरिकांनी चौघांनाही बेदम मारहाण करून पोलिसांना पाचारण केले.

यावेळी निशांत व विजय हे दोघे घटनास्थळी आढळून आले तर ओमकार व अमोल हे पसार झाले होते. रविवारी रात्री या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी सागर रेडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला. निशांत व विजय यांना दोघांना अटक केली. ओमकार व अमोल यांना ताब्यात घेतले. पुढील तपास उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसुर यांनी चालविला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Back to top button