बेळगाव : रामगुरवाडीत पिसाळलेल्या कोल्ह्याच्या हल्ल्यात गर्भवती जखमी | पुढारी

बेळगाव : रामगुरवाडीत पिसाळलेल्या कोल्ह्याच्या हल्ल्यात गर्भवती जखमी

खानापूर ; पुढारी वृत्तसेवा जेवण आटोपून घराबाहेर बसलेल्या गर्भवतीवर पिसाळलेल्या कोल्ह्याने अचानक हल्ला केला. ही घटना (शनिवार) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रामगुरवाडी (ता खानापूर) येथे घडली. सविता लक्ष्मण मादार (वय 35) असे हल्‍ला झालेल्‍या महिलेचे नाव आहे.

कोल्ह्याने चावा घेतल्याने जखमी अवस्थेत तिला तातडीने खानापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून बेळगाव सिव्हिल इस्पितळात पाठविण्यात आले. कोल्ह्याने तिच्या तोंड व मानेवर चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. सविता प्रसूतीसाठी माहेरी आल्या होत्या. ग्रामस्थांनी कोल्ह्याचा पाठलाग करून गावाबाहेर हुसकावून लावले.

Back to top button