निपाणी : आवक वाढल्याने भाज्या स्वस्त, खाद्यतेल महाग | पुढारी

निपाणी : आवक वाढल्याने भाज्या स्वस्त, खाद्यतेल महाग

निपाणी : पुढारी वृत्तसेवा
निपाणी शहराच्या आठवडी बाजारात वाढत्या उन्हामुळे काकडी, गाजर, कलिंगड, लिंबू यांना मागणी वाढली आहे. बाजारपेठेत खाद्य तेलाच्या दरात वाढ झाली आहे. भाजीपाल्याची आवक वाढल्याने बाजारात भाजीपाला स्वस्त होता. मात्र, फळभाज्या महाग झाल्या होत्या.

वांगी 20 ते 40, दोडका 60 ते 80, फ्लॉवर 10 ते 30 रुपये नग, टोमॅटो 20 ते 30 रुपये किलोचा दर आहे. कोबी 10 रुपये नग, मेथी, शेपू, पोकळा व पालक भाजी 5 ते 10 रुपये जुडी अशा दराने विक्री करण्यात येत होते. बटाटे 25 रुपये किलो, कोथिंबीर 5 ते 10 रुपये जुडी, लसूण 50 ते 60 रुपये, लिंबू दहा रुपयाला 4 नग, बिन्स 60 रुपये, भेंडी 60 रुपये किलो, ढबू मिरची 60 रुपये, ओला वाटाणा 40 रुपये, हिरवी मिरची 40 ते 60 रुपये, कारली 40 ते 60 रुपये, वरणा 60 रुपये व काकडी 60 ते 80 रुपये किलो असा दर आहे.

बाजारात किराणा साहित्याचे दर स्थिर आहेत. गहू 30 ते 32, तांदूळ 40 ते 70, बार्शी शाळू 44, तूरडाळ 120, मूगडाळ 120, मूग 120, चवळी 100, मसूर डाळ 100, मटकी 140, हिरवा वाटाणा 140, काळा वाटाणा 80, छोलेे 120 हरभरा डाळ 68 रुपये किलो, बेसण 80 रुपये, इडली रवा 40, साबुदाणा 60, वरी 120, पोहे 40 रूपये, शेंगदाणे 110, फुटाणे डाळ 100, भाजके पोहे 60, किलो, रवा 32, मैदा 30, साखर 38, गूळ 44, किलो, तीळ 160 रुपये किलो, जिरे 260 रुपये किलो असे दर आहेत. विविध मसाल्यांच्या दरात वाढ झाली असल्याची माहिती राहुल चव्हाण यांनी दिली. खाद्यतेलामध्ये सोयाबीन 160, शेंगतेल 180, पामतेल 140, सूर्यफूल 160, सरकी तेल 180, खोबरेल 160 रुपये किलो असा दर आहे.

बाजारपेठेत सफरचंद 100 ते 150 रुपये किलो, द्राक्षेे 60 ते 80, मोसंबी 60 ते 70 रुपये किलो, पेरू 70 ते 90 रुपये किलो, चिकू 40 ते 60 रुपये किलो, संत्री 40 ते 60 रुपये किलो, डाळिंब 80 ते 120, आवळा 100 ते 120, पपई 20 ते 30 रुपये नग, वसई केळी 20 ते 30 रुपये तर जवारी केळी 30 ते 60 रुपये डझन असा दर आहे.
अंडी 51 रुपये डझन, 425 रुपये शेकडा, चिकन 180 ते 200 रुपये किलो, मटण 600 ते 640 रुपये किलो, नदीचे मासे 180 ते 400 रुपये किलो, पापलेट 600 ते 800 रूपये किलो असा दर आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button