बेळगाव जिल्ह्यात २१८ विद्यार्थ्यांना कोरोना; पॉझिटिव्हीटी दर पोहोचला ६ टक्क्यांवर | पुढारी

बेळगाव जिल्ह्यात २१८ विद्यार्थ्यांना कोरोना; पॉझिटिव्हीटी दर पोहोचला ६ टक्क्यांवर

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना बाधक असणार आहे, असे यापूर्वीच सांगण्यात आले होते. त्याप्रमाणेच आता चित्र निर्माण होत असून, जिल्ह्यात तब्बल 218 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामध्ये कित्तूर येथील सैनिक शाळेतील 138 विद्यार्थ्यांचा समावेश असून, इतर ठिकाणच्या 80 विद्यार्थ्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.

जिल्ह्यात आढळलेल्या 218 विद्यार्थ्यांपैकी बहुतेक विद्यार्थ्यांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. काही विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बेळगाव : लहान मुलांतही कोरोनाचा संसर्ग

वाढत्या संसर्गाबाबत बोलताना जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ म्हणाले, कोरोना वेगाने फैलावत आहे. केवळ दहा दिवसांत हजारहून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. दोन वर्षांच्या तुलनेत यंदा लहान मुलांतही कोरोनाचा संसर्ग दिसून येत आहे.

कित्तूर येथील सैनिक शाळेत सुरवातीला 12 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर आतापर्यंत 138 विद्यार्थ्यांत हा संसर्ग फैलावला आहे. तर जिल्ह्यातील विविध शाळांतील 80 विद्यार्थीही कोरोनाबाधित झाले आहेत.

सध्या कोरोना पॉझिटिव्हीटी दर 6 टक्क्यांवर पोहोचला असून, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रुग्णांच्या संख्येत वाढ होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा :

व्हिडीओ पहा : ओमायक्रॉनविषयी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतायत डॉ. संग्राम पाटील| Dr.Sangram Patil on Omicron

Back to top button