HSRP : 'हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' म्‍हणजे काय ? जाणून घ्या त्‍याचे फायदे | पुढारी

HSRP : 'हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' म्‍हणजे काय ? जाणून घ्या त्‍याचे फायदे

पुढारी ऑनलाईंन डेस्क : देशातील सर्व प्रकारच्या वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) लावणे बंधनकारक आहे. पण तरीही अनेक जण या नियमाकडे दुर्लक्ष करत असल्‍याचे दिसते. अशा प्रकारची नंबरप्लेट लावल्याने आपली वाहन सुरक्षित होते, पोलिसांकडून दंड होण्यापासूनही वाचू शकता. जाणून घेऊया काय आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्‍हणजे काय आणि  त्याचे फायदे या विषयी…

HSRP : वाहनाचा सर्व तपशील

HSRP (high security registration plate) या प्लेट्स ॲल्युमिनियमपासून बनवल्या जातात. ज्यावर एक होलोग्राम देखील जोडलेला आहे. तो क्रोमियम आधारित आहे. स्टिकरप्रमाणे दिसणार्‍या होलोग्राममध्ये वाहनाचा सर्व तपशील असतो.

HSRP
युनिक लेजर कोड

सुरक्षेसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर एक युनिक लेझर कोडही छापला जातो. प्रत्येक वाहनासाठी स्वतंत्र कोड दिलेला आहे. तो सहज काढता येत नाही.

HSRP प्लेटची वैशिष्‍ट्य

हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, ती एकदा तुटली की पुन्हा जोडता येत नाही. यासोबतच ही प्लेट अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते. जेणेकरून कोणीही त्याची कॉपी करून बनावट प्लेट बनवू शकत नाही. त्यामुळे वाहनाची सुरक्षा वाढते. त्याची चोरी व गैरवापर करता येत नाही. एखाद्या वाहनाला अपघात झाला तर गाडीला लावलेली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनाच्या मालकासह सर्व माहिती देते. याच्या मदतीने जखमींच्या नातेवाईकांना माहिती पोहोचवता येते.

प्लेटिंग सक्तीचे आहे

केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ च्या नियम ५० नुसार, वाहनावर HSRP लावणे सक्तीचे आहे. या कायद्यांतर्गत एकूण ६ प्रकारच्या वाहनांवर HSRP लावणे बंधनकारक आहे.

१ ) नॉन ट्रान्सपोर्ट वाहने
२ ) ट्रान्सपोर्ट वाहने
३ ) भाडेतत्त्वावर असलेली वाहतूक वाहने
४ ) बॅटरीवर चालणारी रेंट अ कॅब असलेली वाहने
५ ) बॅटरीवर चालणारी नॉन ट्रान्सपोर्ट वाहने
६ ) बॅटरीवर चालणारी ट्रान्सपोर्ट वाहने
नवीन वाहनांव्यतिरिक्त जुन्या वाहनांवरही ते बसवणे आवश्यक आहे.

हेही वाचा : 

Back to top button