New Launching Bikes : पुढील वर्षी लॉंच होणार ‘या’ स्पो्र्टस बाईक; जाणून घ्या नवीन फीचर्स आणि किंमत | पुढारी

New Launching Bikes : पुढील वर्षी लॉंच होणार 'या' स्पो्र्टस बाईक; जाणून घ्या नवीन फीचर्स आणि किंमत

पुढारी ऑनलाईन डेस्क : 2022 मध्ये अनेक नवनवीन बाईक लॉंच झाल्या. royal Enfield hunter 350, MT50 2.0, KTM350duke अशा मोटारसायकलचा समावेश होता. (New Launching Bikes) २०२३ मध्येही नवीन  स्पो्र्टस बाईक भारतात लॉंच होणार आहेत. यापैकी काही आधीच लॉंच झाल्या असून,  ग्राहकांना त्‍या २०२३ मध्ये  उपलब्‍ध होणार आहेत. (New Launching Bikes)

Royal Enfield Super Meteor 650

रॉयल इनफील्ड सुपर मीटओर 650 आहे. रॉयल इनफील्डच्या 650CC पोर्टफोलिओमधील हे तिसरे मॉडेल आहे. Super Meteor ने Rider Mania 2022 मध्ये भारतात पदार्पण केले. Royal Enfield Meteor 650 हे एक रेट्रो क्रूझर डिझाइन आहे. हे 650 ट्विन सारख्याच प्लॅटफॉर्मवर बनवली गेली आहे. ती अधिक आरामदायी आणि थकवा न येता रायडिंग करण्यासाठी नवीन ट्यूबलर स्टील फ्रेमसह येते. या मोटारसायकलचे इंजिन 648 CC पॅरलल-ट्विन ऑइल/एअर-कूल्ड असून, ते 6 स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. हे मॉडेल जानेवारी 2023 मध्ये लॉन्च केले जाणार असून, पुढील वर्षातील पहिल्या ब्लॉकबस्टर लॉन्चपैकी एक असेल. त्याची किंमत सुमारे 3.5 लाख रुपये (एक्स-शोरूम) असेल अशी अपेक्षा आहे. ही बाईक जानेवारी २०२३ मध्ये बाजारात येणार आहे.

Ultraviolette F77 

अल्ट्राव्हायोलेट F77 काही वर्षांपूर्वी प्रदर्शित करण्यात आली होती. भारतात तिची सुरुवातीची किंमत 3.8 लाख (एक्स-शोरूम) सह लॉन्च करण्यात आली होती. दुसऱ्या जनरेशनच्या अल्ट्राव्हायोलेट F77 मध्ये बदललेल्या डिझाइनसह फ्रेम, स्विंगआर्म आणि बॅटरीदेखील नवीन आहे. नवीन फीचरसह ती भारतात लवकरच विक्रीसाठी येणार आहे. भारतात असलेल्या ईलेक्ट्रिक बाईकमधील अल्ट्राव्हायोलेट F77 ही सर्वात जास्त पॉवरफुल मोटरसायकल आहे. 2023 मध्ये F77 आणि F77 Recon ही दोन मॉडेल विक्रीसाठी असणार आहेत. ज्याची किंमत 3.8 लाख रूपये आणि 4.55 लाख रूपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. F77 ही मर्यादित असेल, यामध्ये फक्त 77 मोटरसायकल बनवल्या जाणार आहेत. लिमिटेड एडिशन मॉडेलची किंमत 5.5 लाख रूपये (एक्स-शोरूम) असणार आहे.

Triumph Street Triple 765

ट्रायम्फ मोटरसायकल इंडियाने त्यांच्या नवीन ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल 765 साठी बुकिंग सुरू केले आहे. यामध्ये नवीन स्टाइल आणि अद्ययावत इंजिन आहे. बुकिंगची रक्कम 50,000 रुपये ठेवण्यात आली आहे. एप्रिल 2023 पासून वितरण सुरू होऊन मार्चमध्ये ही बाईक लॉन्च होण्याची शक्यता आहे. नेकेड मिडलवेट मोटरसायकलने गेल्या महिन्यात जागतिक स्तरावर पदार्पण केले होते. ट्रायम्फ भारतात Street Triple 765 चे R आणि RS हे दोन प्रकार लॉन्च करेल.

Ducati DesertX

डुकाटी डेझर्टएक्स हे मार्केटमध्ये अत्यंत बहुचर्चीत मॉडेल आहे.   ऑफ-रोड ओरिएंटेड ॲडव्हेंचर मोटरसायकल ग्राहकांसाठी हे मॉडल आहे. याची रचना 90 च्या दशकातील व्हिंटेज कॅगिव्हा एलिफंट मोटरसायकलपासून प्रेरित आहे. एलईडी हेडलाइट्स, उंच विंडस्क्रीन आणि पातळ, स्लीक लुकने परिपूर्ण आहे. Desert X 937cc, Testastrata 11-डिग्री एल-ट्विन इंजिनसह येते. काटीने डेझर्टएक्सवर 223 किलो वजन कमी केल्याचा दावा केला आहे. (New Launching Bikes) ही बाईक पुढील वर्षात भारतात येणार आहे.

Ducati Diavel V4

फ्लॅगशिप Panigale V4 आणि नंतर Multistrada V4 नंतर, डुकाटी ने ऑक्टोबर 2022 मध्ये Diavel V4 जागतिक स्तरावर सादर केला होते. पुढील वर्षी भारतातही लॉन्च होणार आहे. मस्कुलर इटालियन पॉवर-क्रूझरने आपली ओळख कायम ठेवली आहे. परंतु आता अधिक पॉवरफुल V4 ग्रँटुरिझ्म इंजिन मिळते. जे 1,158CC विस्थापित करते. 10,750 rpm वर 166 bhp आणि 7,500 rpm वर 126 Nm पीक टॉर्क बनवते. यात मोटर 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे, ज्याला दिशात्मक क्विकशिफ्टर देखील मिळते. या मोटारसायकलला एक टाकी, टाकीच्या दोन्ही बाजूला एअर-स्कूप्स, क्वाड-एक्झॉस्ट टिप्स आणि नवीन पॅनल्ससह काही डिझाइन मिळतील. ट्रेलीस फ्रेम च्या ऐवजी डायवेल V4 ला आता ॲल्युमिनियम मोनोकोक चेसिस मिळते. ज्यामुळे मोटारसायकलचे वजन 8 किलोने कमी होते. V4 GranTurismo इंजिन ऑफरवर आहे तसेच रायडर इलेक्ट्रॉनिक्सचे होस्ट आहे. डुकाटी 2023 च्या जूनपूर्वी Diavel V4 लाँच करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

Back to top button