Kinetic Luna EV : ५० वर्षांनंतर कायनेटिकच्या लुनाचे पुनरागमन; इलेक्ट्रिक सवारी पडणार सगळ्यात भारी | पुढारी

Kinetic Luna EV : ५० वर्षांनंतर कायनेटिकच्या लुनाचे पुनरागमन; इलेक्ट्रिक सवारी पडणार सगळ्यात भारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : लुनाचे नाव ऐकलं की लगेचच गाडीची सवारी डोळ्यासमोर येते. भारतात दुचाकीमध्ये सर्वात प्रसिद्ध गाड्यांपैकी एक म्हणजे Kinetic कंपनीची लुना. या गाडीची क्रेझ इतकी आहे की, अजूनही याचे चाहते ही गाडी पुन्हा बाजारात असायला हवी असं मत व्यक्त करतात. सध्या ही लोकप्रिय लुना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे ही गाडी भारतातल्या रस्त्यांवर पुन्हा धावताना दिसणार आहे. हे पुनरागमन इलेक्ट्रीक अवतारात दिसणार आहे. त्यामुळे लुनाचे चाहत्यांमध्ये (Kinetic Luna EV) ही गाडी कधी येणार याची उत्सुकता लागून राहीली आहे.

Kinetic Luna EV : इलेक्ट्रीक लुनाचे उत्पादन सुरु

या नव्या कायनेटिक लुनामध्ये इलेक्ट्रिक पॉवरट्रेन दिली जात आहे. कायनेटिक इंजिनिअरिंग लि. (KEL) ने घोषणा केली की त्यांनी त्यांच्या लोकप्रिय लुना गाडीच्या इलेक्ट्रिक चेसिस आणि इतर पार्टच्या असेंब्लीचे उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे ही झिरो-एमिशन दुचाकी लवकरच लॉन्च केली जाईल. कंपनीने एका अहवालामध्ये असा दावा देखील केला आहे की, काही दिवसांनंतर कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन्स या ईव्ही बाईकची विक्री करण्यासाठी सज्ज असेल.

KEIL ने या नव्या इलेक्ट्रिक लुनाचे मुख्य चेसिस, मुख्य स्टँड, साइड स्टँड आणि स्विंग आर्म अशा महत्त्वाचे पार्ट्स बनवून तयार आहेत. याचे उत्पादन महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये केले जात आहे. या प्लांटची दरमहा 5,000 युनिट्स इतकी उत्पादन क्षमता असेल. या गाडीचे डिझाईन मात्र कसे असेल याची माहिती अजून कंपनीने दिली नाही. त्यामुळे आता ही नवी लुना कोणत्या रंगांमध्ये असेल, डिझाईन कसे असेल याची योग्य ती माहिती मिळेपर्यंत वाट पहावी लागेल.

हेही वाचा

Back to top button