Jeep Grand Cherokee : ‘ग्रँड चेरोकी’ एसयुव्ही कार ‘या’ दिवशी होणार लाँच | पुढारी

Jeep Grand Cherokee : ‘ग्रँड चेरोकी’ एसयुव्ही कार 'या' दिवशी होणार लाँच

पुढारी ऑनलाईन डेस्क : जीप कंपनीने भारतीयासाठी नवी SUV कार बाजार आणली आहे. ग्रँड चेरोकी असे कारचे नाव असून ही आगामी काळातील नवी एसयुव्ही कार असल्याचा कंपनीने दावा केला आहे. दरम्यान, कारचे लाँचिंग 11 मोव्हेंबर रोजी होणार होते आता ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. कंपनीने यासंदर्भात नवी माहिती जाहीर केली आहे. (New Jeep Grand Cherokee)

जीपच्या पाचव्या जनरेशनमधील ग्रँड चेरोकी या एसयुव्हीचे उत्पादन सुरू झालेले आहे. त्यामुळे ही एसयुव्ही लवकरच शोरूममध्ये डिस्प्ले करण्यात येईल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या कारचे नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात वितरण सुरू करण्यात येईल. 2022 च्या सुरूवातीला जीपने मेरिडिअन ही एसयुव्ही कार लाँच केलेली होता. आता जीपची ग्रँड चेरोकी ही यावर्षातील दुसरी एसयुव्ही कार लाँच होणार आहे. ही कार 17 नोव्हेंबर रोजी लाँच करण्यात येईल अशी घोषणा बुधवारी कंपनीने केली आहे. एक लाख रूपयांचे टोकन देऊन या कारचे बुकिंग याआधीच सुरू करण्यात आले आहे. (New Jeep Grand Cherokee)

जाणून घ्या कारची फिचर्स

इंजिन

जीप ग्रँड चेरोकी 5.7-लिटर V8 इंजिनसह सुसज्ज आहे. हे इंजिन 357 bhp पॉवर आणि 528 Nm टॉर्क जनरेट करते. यात 2.0-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल मोटर देखील मिळते. जी 375 bhp पॉवर आणि 637 Nm असा टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर यामध्ये 3.6-लीटर V6 पेट्रोल इंजिन देखील उपलब्ध आहे जे 294 hp आणि 348 Nm टॉर्क निर्माण करते.

Jeep Grand Cherokee

फिचर्स

कारच्या आतील भागात, All-Laether Upholestry आणि 19-Speaker Sound System बसविण्यात आलेले आहे. 10.25-इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे. ही स्क्रीन Apple CarPlay आणि Android Auto यासारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. चालकाच्या मागील प्रवाशांसाठी देखील मनोरंजनासाठी वेगळ्या स्क्रीन आहेत. यासोबतच स्ट्रीमिंग साइट्सवरून प्लेबॅकला फिचरसाठी कारमध्ये 4G सेवा देण्यात आला आहे. नवीन ग्रँड चेरोकीला पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळणार आहे.

Jeep Grand Cherokee

हेही वाचा

Back to top button