पुढारी वृत्तसेवा
टीम इंडियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या एका फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.
यामध्ये तो एका विदेशी महिलेसोबत दिसत आहे. मात्र, या महिलेला कोणीही ओळखू शकले नाही. युवराजने समुद्राच्या मध्यभागी एका जहाजावर तिच्यासोबत हे फोटोशूट केले.
युवराज आणि त्या महिलेव्यतिरिक्त इतर अनेक मॉडेल्स देखील आहेत.
ग्रुप फोटोंव्यतिरिक्त युवराजचे एका महिलेसोबतचे स्वतंत्र फोटोही आहेत, ज्यामुळे ती महिला कोण? असा सर्वांना प्रश्न पडला.
खरं तर, युवराजसोबत दिसणारी ती महिला कॅनडाची टेनिसपटू आणि मॉडेल अनेलिया फ्रेजर (Anelia Fraser) आहे.
अनेलियाने तिच्या इंस्टाग्राम पेजवरील बायोमध्ये 'टेनिस, स्पोर्ट्स मीडिया आणि ॲक्टर' असे अपडेट केले आहे.
अनेलिया पूर्वी टेनिस खेळायची, पण आता ती मॉडेलिंग, ॲंकरिंग आणि ॲक्टिंगमध्ये आपले नशीब आजमावत आहे.
ती टेनिस आणि मॉडेलिंगशी संबंधित तिचे खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. इंस्टाग्रामवर तिचे ४४ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
तिने युवराजसोबत एका जाहिरातीसंदर्भात फोटोशूट केले आहेत. ही जाहिरात 'फिनो टकीला' नावाच्या कंपनीची आहे, ज्याचा युवराज ब्रँड ॲम्बेसेडर आहे.
युवराजच्या फोटोंवर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने त्याची फिरकी घेतली. हरभजनने कमेंटमध्ये लिहिले, "पाजी घरी जायचे आहे की नाही! एवढ्या महिला एकत्र केल्या आहेत. चांगले माणूस बना आता."