बिया काढून फेकता अन् पपई खाता.. मग तर वाचांच..

पुढारी वृत्तसेवा

बियांमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लामेटरी तत्व किडनीला इन्फेक्शन आणि सूजेपासून वाचवतात.

पपईची बी शरीरातील घातक टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

पपईच्या बिया आतड्यांमधील बॅड बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करते.

पपईच्या बियांमधील नॅचरल अँटी-इंफ्लामेटरी तत्वांमुळे सांधेदुखी आणि सूज यामध्ये आराम मिळतो.

पपईच्या बियांमध्ये असलेलं फायबर मेटाबॉलिझम वाढवतं. त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं.

पपईच्या बियांचे अनेक फायदे असले तरी जास्त प्रमाणात बिया खाल्ल्या तर शरीराचं नुकसानही होऊ शकतं.

पपईच्या बिया तशाचही खाता येतील किंवा स्मूदीमध्ये घालूनही खाता येतील. या बिया वाळवून त्‍याची पावडर बनवून रोज एक चमचा मधातून खाता येईल. अधिक खाणे शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते.

वरील माहिती इंटरनेटवरून घेतली आहे. ती वाचकांपर्यंत पोहोचवणे इतकाच हेतू आहे. त्‍यामुळे तज्ञ व्यक्तीचा सल्ल्याशिवाय वापर करणे टाळावे. अन्यथा आरोग्याच्या समस्या निर्माण होउ शकतात.