पुढारी वृत्तसेवा
झोपण्याच्या पद्धतीमुळेही केसगळती?
केसगळतीमागे चुकीचा आहार, ताणतणाव, अपुरी झोप ही कारणे असतात. मात्र, झोपण्याच्या काही चुकीच्या सवयींमुळेही केसांचे नुकसान होऊ शकते.
ओल्या केसांनी झोपणे टाळा
केस धुतल्यानंतर लगेच झोपू नका. ओले केस अधिक नाजूक असतात. उशीशी होणाऱ्या घर्षणामुळे केस तुटण्याची शक्यता वाढते.
कोंडा आणि संसर्गाचा धोका
ओल्या केसांनी झोपल्यामुळे टाळूवर ओलावा टिकून राहू शकतो. त्यामुळे काही परिस्थितींमध्ये कोंडा आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढू शकतो.
केस घट्ट बांधून झोपू नका
रात्री झोपताना केस घट्ट बांधल्यामुळे केसांच्या मुळांवर ताण पडतो. त्यामुळे केस तुटू शकतात. सतत ताण पडल्यास ट्रॅक्शन अलोपेसियाचा धोकाही वाढतो.
कॉटनच्या उशीमुळे केसांचे नुकसान?
कॉटनच्या उशीच्या कव्हरमुळे केसांमध्ये घर्षण होऊन ते गुंतू शकतात. त्यामुळे केसांचा कोरडेपणा आणि फ्रिझीनेस वाढण्याची शक्यता असते.
सिल्कच्या उशीचे कव्हर वापरा
केसांचे घर्षण कमी करण्यासाठी सिल्कच्या उशीचे कव्हर वापरणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे केस गुंतण्याचे आणि तुटण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते.
झोपताना केसांची सैल वेणी घाला
रात्री झोपण्यापूर्वी केस घट्ट बांधण्याऐवजी सैल वेणी घाला. यामुळे केसांच्या मुळांवर अनावश्यक ताण पडत नाही आणि केस गुंतण्याचे प्रमाण कमी होते.
झोपण्यापूर्वी अशी घ्या केसांची काळजी
त्वचारोगतज्ज्ञांच्या मते झोपण्यापूर्वी केस व्यवस्थित कोरडे करा, सैल बांधा आणि घर्षण कमी करणाऱ्या उशीच्या कव्हरचा वापर करा. वरील माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. तज्ञांचा सल्ला घ्यावा..