Namdev Gharal
मार्बल म्हटले की आपल्यासमोर येतो तो म्हणजे ताजमहल, पांढऱ्या शुभ्र रंगाच्या मार्बलमधील ही वास्तू मुमताज शहाजहानच्या प्रेमाचे प्रतिक आहे. पण जगात असे मार्बल खूप महाग असतात.
व्हाइट स्टॅच्युआरिओ मार्बल हे इटली या देशातून येणारे हे जगातील आलिशान मार्बल मानले जाते. याच्या पांढरा शुभ्र रंगावरील राखाडी (Grey) रंगाचे ठळक पट्टे याला खास बनवतात. २,००० ते ₹५,००० प्रति चौरस फूट इतकी याची किंमत असते
कालाकाट्टा गोल्ड मार्बल : हेही मार्बल इटली या देशात सापडते पांढऱ्या बॅकग्राउंडवर सोनेरी आणि राखाडी रंगाच्या नसा हे याचे मुख्य आकर्षण आहे. याची किंमत 1500 ते 4000 हजार प्रति चौरस फूट इतकी असते
नेरो पोर्टोरो मार्बल इटली ती ला स्पेझा या ठिकाणाहून येणारे हे जगातील सर्वात महागडे 'काळे' मार्बल आहे. गडद काळ्या रंगावर नैसर्गिक सोनेरी रंगाच्या रेषा एखाद्या कलेसारख्या दिसतात.
ब्लू सोडालाईट (Blue Sodalite) ब्राझीलमध्ये सापडणारे हे मार्बल, याचा गडद निळा रंग आणि रॉयल लूक यामुळे याला प्रचंड मागणी असते. 'फिचर वॉल' किंवा शोभेच्या वस्तूंसाठी वापरला जातो.
थासोस व्हाइट मार्बल याला 'जगातील सर्वात पांढरा मार्बल' म्हटले जाते. यात कोणत्याही नसा किंवा पट्टे नसतात, केवळ शुद्ध पांढरा रंग असतो जो प्रकाश परावर्तित करतो.
हे मार्बल इतके महाग असण्याचे कारण म्हणजे या दगडांच्या खाणी मर्यादित ठिकाणीच आहेत.
याची किंमत जितका शुभ्र पांढरा रंग जितका अधिक शुद्ध, तितकी किंमत जास्त ठरते
इटली किंवा ब्राझीलमधून आयात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर टॅक्स आणि वाहतूक खर्च येतो. परिणामी याची किंमत वाढते