पुढारी वृत्तसेवा
वाघ हा जंगलातील अत्यंत खतरनाक शिकारी म्हणून ओळखला जातो.
हा वाघ जितका घातक असतो, तितकाच तो सुंदरही दिसतो.
सर्वसाधारणपणे तांबूस-पिवळसर शरीरावर असलेल्या काळ्या चमकदार पट्ट्यांमुळे वाघाचे सौंदर्य आणखी खुलून दिसते.
आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील ‘गोल्डन टॅबीला’ हा जगातील सर्वात सुंदर वाघ असल्याचे मानले जात आहे.
कारण, हा वाघ नेहमीच्या वाघांपेक्षा फारच वेगळा दिसतो. त्याच्या अंगावरील काळे पट्टे खूपच फिकट आहेत.
असे असले तरी हा कुठल्याही दुर्मीळ प्रजातीचा वाघ नाही.
त्याच्या शरीरातील रंगद्रव्य तयार करणाऱ्या जीनमध्ये काही बदल झाल्यामुळे हा वाघ निराळा दिसत आहे.
या वाघाचे फोटो व्हायरल होत आहेत.
‘गोल्डन टॅबीला’ला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी दिसत आहे.