World's Longest Train Journey ‌: ‘हा‌’ आहे जगातील सर्वात लांब रेल्वे प्रवास

रणजित गायकवाड

साधारणपणे देशांतर्गत लांब अंतराच्या प्रवासासाठी लोक रेल्वेचा वापर करतात, तर दुसऱ्या देशात जाण्यासाठी विमान प्रवास हा सर्वात सोपा पर्याय मानला जातो.

जगात अशी एक खास रेल्वे यात्रा आहे, जी अनेक देशांच्या सीमा ओलांडत एकूण 13 देशांमधून जाते. ही जगातील सर्वात लांब रेल्वे यात्रा मानली जाते.

जगातील हा सर्वात लांब रेल्वे प्रवास पोर्तुगालमधील लागोस शहरापासून सुरू होऊन सिंगापूरला संपतो.

इतक्या लांब रेल्वे प्रवासात ट्रेन 13 देशांमधून जाते; पण या प्रवासात थांबे फक्त 11 ठिकाणी असतात.

या रेल्वे प्रवासात ट्रेन एकूण 18,755 किलोमीटर अंतर पार करते आणि 13 देशांच्या सीमांमधून जाते.

हा रेल्वे प्रवास सुमारे 21 दिवसांचा असतो.

या सर्वात लांब रेल्वे प्रवासादरम्यान ट्रेन स्पेन, फ्रान्स, रशिया, चीन, व्हिएतनाम, थायलंड आणि सिंगापूर या देशांमधून जाते.

या मार्गावर पॅरिस, मॉस्को, बीजिंग आणि बँकॉक यासारख्या प्रसिद्ध शहरांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.