पुढारी वृत्तसेवा
तमिळनाडूच्या महाबलीपुरम येथून जगातील सर्वात मोठे शिवलिंग बिहारच्या गोपाळगंजमध्ये पोहोचले आहे.
या शिवलिंगाची लांबी ३३ फूट आणि वजन २१० मेट्रिक टन आहे.
या विशाल शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा १७ जानेवारी रोजी पूर्व चंपारणमधील केसरिया ब्लॉकमधील 'विराट रामायण मंदिरा'त विधिवत केली जाईल.
World largest Shivlingतमिळनाडूच्या महाबलीपुरम येथील पट्टीकाडू गावात एकाच काळ्या ग्रॅनाइट दगडापासून हे शिवलिंग तयार करण्यात आले आहे.
कारागिरांना हे शिवलिंग तयार करण्यासाठी सुमारे १० वर्षे लागली.
शिवलिंगावर १००८ सहस्रलिंगम कोरण्यात आले आहेत.
विराट रामायण मंदिराचे बांधकाम सुरू आहे. हे मंदिर १०८० फूट लांब आणि ५४० फूट रुंद असेल. मुख्य शिखरांची उंची २७० फूट असेल.