World Bicycle Day | 3 जून हा ‘वर्ल्ड सायकल डे’ : जाणून घेऊया सायकलविषयी काही रंजक गोष्‍टी

Namdev Gharal

सायकलचा सुरुवातीचा प्रकार 1817 मध्ये कार्ल ड्रेइस नावाच्या जर्मन संशोधकाने तयार केला होता, ज्याला "Draisine" म्हणत.

पहिली ‘पेडल असलेली सायकल’ 1860 च्या सुमारास फ्रान्समध्ये तयार झाली.

सध्या बहूतांश वापरात असलेला सायकलचा ‘चेन ड्राइव्ह’ प्रकार 1885 मध्ये आला

अनेक देशांमधील पोलिस सायकलचा वापर गस्‍त घालण्यासाठीही करतात यामध्ये नेदरलँडस, अमेरिका व भारतातही काही राज्‍यांमध्ये पोलिस पेट्रोलिंगसाठी सायकलचा वापर करतात.

सायकल ॲम्ब्युलन्स – दुर्गम भागात, विशेषतः आफ्रिकेत, रुग्णांना सायकलवरून दवाखान्यात नेले जाते.

सायकल हे शून्य प्रदूषण करणारे वाहन आहे.

ते वाहतुकीचा खर्च आणि इंधनावरचा अवलंब कमी करते.

दररोज सायकल चालवल्यास हृदय विकाराचा धोका 50% नी कमी होतो.

मानसिक तणाव, लठ्ठपणा, आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास सायकलिंग फायदेशीर आहे.