महिला पायात चांदीचे पैजण घालतात, सोन्याचे का नाही? जाणून घ्या कारण...

पुढारी वृत्तसेवा

सोनं गुंतवणुकीसाठी फायद्याचं

सोनं हे सुरक्षित गुंतवणूक साधन मानलं जातं. त्यामुळे लोक दागिने, बिस्किट आणि बॉन्ड स्वरूपात ते वापरतात.

पण सोन्याचे पैंजण क्वचितच का दिसतात?

कानातले, अंगठी, चैन सामान्य आहेत, पण पायात सोनं घालणं फारच कमी दिसतं.

परंपरेनुसार सोनं = लक्ष्मीचं प्रतीक

सोनं हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे ते कमरेखाली घालणं टाळलं जातं.

पायात सोनं घालणं अपमानासारखं मानलं जातं

धार्मिक श्रद्धेनुसार पायात सोनं घालणं म्हणजे लक्ष्मीचा अपमान मानला जातो.

ज्योतिषशास्त्राचं मत काय?

सोनं हे गुरु ग्रहाशी संबंधित मानलं जातं. पायात घातल्यास नकारात्मक परिणाम होतात अशी समजूत आहे.

ग्रहदोषाची भीती

काही मान्यतानुसार पायात सोनं घातल्यास गरिबी, राग आणि मानसिक त्रास वाढू शकतो.

चांदीचे पैंजण का लोकप्रिय?

चांदी हे चंद्र आणि शुक्राशी संबंधित मानलं जातं, जे शांतता आणि सुख देतात.

“वैज्ञानिक” कारण काय सांगतं?

लोकमान्यतेनुसार सोनं उष्णता वाढवतं आणि चांदी थंड ठेवते—म्हणून संतुलनासाठी पायात चांदी घालतात.

निष्कर्ष: परंपरा + श्रद्धा यांचा प्रभाव

सोन्याचे पैंजण कमी दिसण्यामागे मुख्य कारण म्हणजे धार्मिक श्रद्धा, ज्योतिष आणि सामाजिक परंपरा.