Asit Banage
थंडीची चाहूल लागताच बाजारपेठांमध्ये लालचुटूक आणि रसाळ स्ट्रॉबेरीची फळे दिसायला लागतात.
चवीला गोड-आंबट असलेली ही फळे केवळ खाण्यास रुचकर नसून आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी मानली जातात.
विशेषतः महाराष्ट्रातील महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरातील स्ट्रॉबेरी देशभरात प्रसिद्ध आहे.
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास ते मदत करते.
तसेच त्वचेतील कोलेजन निर्मितीसाठी ते उपयुक्त ठरते.
स्ट्रॉबेरीतील अँटिऑक्सिडंटस्, फायबर आणि पोटॅशियम हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.
यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि वाईट कोलेस्टेरॉलचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.
स्ट्रॉबेरीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आणि कॅलरीज कमी असतात.