Namdev Gharal
हिवाळी आला की छाती भरणे, सूज, खोकला इत्यादी लक्षणे दिसतात. त्यामुळे या दिवसात फुफ्फुसांचे आरोग्य सांभाळने गरजेचे ठरते
यासाठी काही विशिष्ट अन्नपदार्थ फुफ्फुसांच्या पेशींचे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस (पेशींचे नुकसान) आणि सूज (Inflammation) यांपासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात
संत्री, आवळा, किवी आणि लिंबू यांसारख्या फळांमध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. हे अँटिऑक्सिडंट फ्री रॅडिकल्समुळे पेशींचे होणारे नुकसान टाळण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवते.
पालक, ब्रोकोली आणि इतर हिरव्या भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि वनस्पतीजन्य पोषक घटक असतात, जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात.
ओमेगा-३ फॅटी अॅसिडमध्ये ॲन्टी इन्म्फ्लेमेंटरी गुणधर्म असतात. यामुळे फुफ्फुसांच्या पेशींचे संरक्षण होते सॅल्मन आणि सार्डिन यांसारखे चरबीयुक्त मासे, तसेच अक्रोड, जवस आणि चिया सीड्स हे याचे उत्तम स्रोत आहेत.
टोमॅटोमध्ये 'लायकोपीन' (Lycopene) नावाचे अँटिऑक्सिडंट असते, जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास उपयुक्त ठरते. टोमॅटो आणि इतर रंगीबेरंगी भाज्यांचा आहारात समावेश केल्याने एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत होते.
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि रास्पबेरी यांमध्ये 'अँथोसायनिन्स' (Anthocyanins) आणि इतर अँटिऑक्सिडंट्स असतात, जे पेशींचे ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून संरक्षण करतात.
शरीर हायड्रेटेड ठेवा : पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने श्वसनमार्गातील कफ (Mucus) पातळ राहण्यास मदत होते, ज्यामुळे श्वसनसंस्थेला तो सहजपणे बाहेर टाकता येतो. दिवसभर थोड्या-थोड्या वेळाने पाणी पित राहा.
बदाम, अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बियांमधून व्हिटॅमिन-ई, हेल्दी फॅट्स आणि इतर पोषक तत्त्वे मिळतात, जी शरीराची अँटिऑक्सिडंट संरक्षण यंत्रणा मजबूत करतात.