हिवाळ्यात पाणी पिणे विसरताय? 'असे' ठेवा स्वतःला हायड्रेटेड

मोनिका क्षीरसागर

तहान लागण्याची वाट पाहू नका: हिवाळ्यात घाम कमी येतो, त्यामुळे तहान लागत नाही, पण शरीराला पाण्याची गरज असतेच.

कोमट पाण्याचे सेवन: गार पाण्याऐवजी कोमट पाणी प्या, यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते आणि पचन सुधारते.

पाण्याचे रिमाइंडर लावा: पाणी पिण्याचे विसरू नये म्हणून मोबाईलमध्ये 'वॉटर रिमाइंडर' ॲप वापरा किंवा ठराविक अंतराने अलार्म लावा.

हर्बल टी किंवा काढा: साध्या पाण्याला कंटाळा आला असेल, तर ग्रीन टी, आल्याचा चहा किंवा तुळशीचा काढा घेऊ शकता.

पाणीयुक्त फळे आणि भाज्या: आहारात संत्री, द्राक्षे, काकडी आणि पालेभाज्यांचा समावेश करा, ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते.

सूपचा आनंद घ्या: शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि उबदारपणा मिळवण्यासाठी गरम पौष्टिक सूप हा एक उत्तम पर्याय आहे.

बाहेर जाताना बाटली सोबत ठेवा: तुम्ही घराबाहेर असाल तरीही पाणी पिण्याचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून नेहमी स्वतःची पाण्याची बाटली सोबत ठेवा.

त्वचेची काळजी घ्या: पाणी कमी प्यायल्याने त्वचा कोरडी पडते, त्यामुळे ग्लोइंग स्किनसाठी दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी नक्की प्या.

येथे क्लिक करा...