मोहन कारंडे
हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पारा चांगलाच घसरणार आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्याची लाट वेगाने वाहत असल्याने महारष्ट्रात कडाक्याची थंडी पडत आहे.
या थंडीत आजारी पडू नये यासाठी खाली दिलेले सोपे उपाय लगेच करून पहा!
आल्याचा कडक चहा
थंडी वाजणे किंवा सर्दी झाल्यावर आले सर्वात प्रभावी ठरते. आले शरीरात उष्णता निर्माण करते आणि घसा मोकळा करते.
हळदीचे दूध
हळदीचे दूध हे 'अँटी-इंफ्लेमेटरी' आणि 'अँटी-ऑक्सिडंट' गुणांनी समृद्ध आहे. हे थंडीमुळे होणारा सांधेदुखीचा त्रासही कमी करते.
मोकळ्या श्वासांसाठी वाफ
नाकात कफ जमा झाल्यास किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास गरम पाण्याची वाफ घेणे हा सर्वात सोपा आणि त्वरित आराम देणारा उपाय आहे.
खोकल्यासाठी मध आणि तुळस
मध घशाला आराम देते आणि खोकल्याची तीव्रता कमी करते, तर तुळस जंतुसंसर्ग दूर ठेवण्यास मदत करते.
पौष्टिक सूप
थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता आणि पोषण दोन्ही आवश्यक असते. भाज्यांचे सूप शरीराला आतून गरम ठेवते आणि पाण्याची कमतरता भरून काढते.
रोज सकाळी १ चमचा 'तूप'
देशी तुपात हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमिन ए असते. ते त्वचेला आतून 'ल्युब्रिकेट' करते आणि ओलावा टिकवून ठेवते.
गूळ
गूळ शरीरातील विषारी घटक बाहेर काढतो आणि रक्त शुद्ध करतो. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते. थंडीत साखरेऐवजी चहा किंवा दुधात गुळाचा वापर करा. तुम्ही गूळ आणि तिळाचे लाडू देखील खाऊ शकता.