स्वालिया न. शिकलगार
एका बाऊलमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात थोडेसे सेंधव मीठ व शॅम्पू टाका.
१५ मिनिटे पाय भिजवून नंतर मृत त्वचा काढून टाका.
दोन चमचे खोबरेल तेल किंचित कोमट करून त्यात थोडे कापूर मिसळा
रात्री झोपण्यापूर्वी हा लेप टाचांना लावून मोजे घालून झोपा
साजूक तूप थोडे कोमट करून त्यात चिमूटभर हळद-मध मिसळा
हा लेप फाटलेल्या टाचांवर लावा. भेगा लवकर भरतात.
सम प्रमाणात ग्लिसरीन-गुलाबजल एकत्र करून टाचांना लावा
रात्री झोपण्यापूर्वी टाचा स्वच्छ धुवून एरंडेल तेल लावा
टाचांच्या खोलवर गेलेल्या भेगा बुजण्यास मदत होते