पुढारी वृत्तसेवा
हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे ओठ फाटणे ही एक सामान्य समस्या आहे.
पण काळजी करू नका, यावर आयुर्वेदिक उपाय आहेत!
अर्धा चमचा दुधाच्या मलईत (साय) एक चिमूट हळद मिसळा. हे मिश्रण ओठांवर लावा.
कोरड्या हवेमुळे ओठ फाटले असतील तर रात्री झोपताना सरसूचे तेल किंवा कोमट तूप बेंबीत लावावे.
बदाम उगळून रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर लावल्याने ओठ मुलायम होऊन त्यावर पापडी येत नाही.
सकाळी स्नानापूर्वी तळहातावर २-३ थेंब गोडे तेल घ्यावे. बोटाने रगडून मग तेल ओठांवर लावल्याने ओठ फाटत नाहीत.
शुद्ध तुपात किंचित मीठ मिसळून ओठांवर आणि बेंबीत लावल्याने ओठ फाटत नाहीत.
फाटलेल्या ओठांवर ग्लिसरीन लावल्याने पण आराम येतो.