Namdev Gharal
आज आपण एका दुर्लक्षित पण अतिशय बहुगुणी भाजी विषयी पाहणार आहोत या भाजीची म्हणजे शेंगा तसेच पाने, फुले, बिया इतकेच काय तर काही ठिकाणी मुळेही खाल्ली जातात
याला मराठीत 'चौरस मटार' किंवा 'चारकोनी घेवडा' असे म्हणतात. याच्या शेंगेवर चार बाजूंना चंदेरी किंवा हिरवे पंखासारखे कडा (Wings) असतात, म्हणून याला 'Winged Bean' म्हटले जाते.
मल्याळममध्ये या भाजीला ‘इराची पयार’ असे म्हणतात. कारण इराची म्हणजे मांस, म्हणजे मांसासारखे अनेक पोषणमुल्ये या भाजीतून मिळतात
ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. उष्ण व दमट हवामानात ही जोमाने वाढते. भारतात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू ही भाजी आढळते
या भाजीचे मुख्य भाग म्हणजे शेंगा, कच्च्या किंवा अर्धवट शिजवलेल्या शेंगा भाज्या किंवा कोशिंबीरीत वापरल्या जातात.
पाने याची पाने पालेभाज्यांप्रमाणे (पालक किंवा मेथीसारखी) शिजवून खाता येतात. फुलांचा वापर सॅलेडमध्ये किंवा काही विशिष्ट पदार्थांमध्ये चव आणि रंग आणण्यासाठी केला जातो.
बिया : वाळलेल्या बियांमध्ये सोयाबीनसारखे भरपूर प्रोटीन असते. या बिया भाजून किंवा डाळीसारख्या वापरता येतात.
मुळे जमिनीखाली तयार होणारे कंद बटाट्यासारखे किंवा रताळ्यासारखे चवदार आणि स्टार्चयुक्त असतात, ज्यांना उकडून किंवा भाजून खाल्ले जाते.
प्रथिने : यामध्ये सोयाबीनच्या बरोबरीने उच्च दर्जाची प्रथिने असतात, ज्यामुळे शाकाहारी लोकांसाठी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे.
जीवनसत्त्वे व खनिजे: यात लोह (Iron), कॅल्शियम, व्हिटॅमिन 'ए' आणि व्हिटॅमिन 'सी' भरपूर प्रमाणात असते, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
पचनक्रिया: यात फायबरचे (Fiber) प्रमाण चांगले असल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. ही भाजी दुर्मीळ आहे मोठ्या सुपरमार्केटमध्ये, किंवा सेंद्रीय शेती करणारे हौशी याची लागवड करतात