Namdev Gharal
विम्बल्डन टेनिस स्पर्धेमध्ये एका बहिरी ससाण्याची नियुक्ती केली आहे.तुम्हाला आर्श्चय वाटेल हा ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबचा (AELTC) अधिकृत कर्मचारी आहे
या ससाण्याचे नाव आहे रुफस Rufus असून रुफसला विम्बल्डनचा अधिकृत कर्मचारी मानले जाते. त्याच्याकडे स्वतःचे 'Bird Scarer' (पक्षांना हाकलणारा) या पदनामाचे अधिकृत ओळखपत्र देखील आहे.
रुफसचे काम काय तर कबूतर हाकलणे, विम्बल्डनच्या मैदानावर कबुतरांमुळे सामन्यात अडथळा येऊ नये आणि कोर्ट खराब होऊ नये, म्हणून ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबने त्याची खास नियुक्ती केली आहे
तो २००८ पासून सेवेत , रुफस जेव्हा तो अवघ्या १८ आठवड्यांचा होता तेव्हापासून तो सलग विम्बल्डनमध्ये आपली सेवा देत आहे. हॅरिस हॉक या प्रजातीचा हा ससाणा असून याचे वय ३० वर्षे असते
कबुतरांना न मारता पळवणे: रुफस हा कबुतरांची शिकार करत नाही. जेव्हा त्याचे हँडलर (मार्गदर्शक) त्याला विम्बल्डनच्या मैदानावर हवेत सोडतात, तेव्हा त्याचा वावर आणि त्याची केवळ उपस्थिती पाहूनच कबूतर घाबरून तिथून पळून जातात.
कामाची वेळ: विम्बल्डन स्पर्धा सुरू असताना, दररोज सकाळी सामने सुरू होण्यापूर्वी साधारण २ तास रुफसला संपूर्ण मैदानावर आणि छतांवर फिरवले जाते, जेणेकरून तिथे एकही कबूतर फिरकणार नाही. वर्षातील इतर दिवसांतही त्याची अशी गस्त सुरू असते.
विम्बल्डनच्या इतिहासात रुफस हा अत्यंत लोकप्रिय ठरला असून त्याला टेनिस चाहत्यांकडून 'अन्संग हिरो' (Unsung Hero) म्हणून ओळखले जाते.
रुफस आता जवळपास १८ वर्षांपेक्षा जास्त काळ विम्बल्डनच्या 'ऑल इंग्लंड क्लब'च्या मैदानांची राखण करत आहे. हॅरिस हॉक प्रजातीचे पक्षी सुमारे ३० वर्षांपर्यंत जगू शकत असल्याने तो अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त आणि सक्रिय आहे.
विम्बल्डनमध्ये प्रेक्षकांना जसे स्ट्रॉबेरी आणि क्रीम खाऊ घातले जाते तसेच 'रुफस' देखील विम्बल्डनच्या परंपरेचा एक अविभाज्य भाग बनला असून तो आजही पहाटे ४ ते सकाळी ९ या वेळेत सेंटर कोर्टवर गस्त घालताना दिसतो.