Namdev Gharal
रानकुत्रे किंवा वाईल्ड डॉग हा जंगलातील एक असा खुंखार शिकारी प्राणी आहे की जो वाघ किंवा सिंहालाही घाबरत नाही, सिंह सुद्धा याच्या वाटेला जात नाही
यांना निसर्गातील सर्वात निर्दयी आणि भयानक शिकारी म्हटले जाते, यांची नजर एकदा एखाद्या प्राण्यावर नजर पडली, की त्याची सुटका अशक्यच.
वाघ किंवा सिंहाचा शिकारीचा सक्सेस रेट ३०% असतो. पण रानकुत्र्यांचा शिकारीतील यश मिळवण्याचा दर ८५% पेक्षा जास्त असतो!
'पॅक हंटिंग' किंवा झुंडीने शिकार करण्याची पद्धत, रानकुत्रे कधीही एकटे शिकार करत नाहीत. ते नेहमी १० ते २० कुत्र्यांच्या टोळीने हल्ला करतात. त्यामुळे यशस्वी होतात
त्यांची आपसातील ताळमेळ आणि रणनीती अगदी हुबेहूब सैन्यासारखी असते. कोणी कसा हल्ला करायचा कोण आडवे जाऊन शिकारीचा चकवायचे कोणी पाठलाग करायचा हे ठरलेले असते
क्रूर शिकारी : हे प्राणी शिकार मारण्यासाठी तिचे प्राण जाण्याची वाट पाहत नाहीत! जिवंत प्राण्यालाच खाणे ही यांची सर्वात भयानक पद्धत मानली जाते.
एकाकी सिंहालाही २०-२५ रानकुत्र्यांची टोळी भारी पडू शकते. रानकुत्रे सिंहाला घेरून चारही बाजूंनी सतत वार करतात. अनेकदा अन्नासाठी किंवा टोळीच्या रक्षणासाठी यांनी सिंहालाही ठार मारल्याच्या घटना घडल्या आहेत!
रानकुत्र्यांची पळण्याची आणि सहन करण्याची क्षमता अफाट असते. शिकारीचा मैलोन्-मैल पाठलाग करतात. शिकार पळून पळून पूर्णपणे थकते, आणि शेवटी शरण जाते.
हे नेहमीच्या कुत्र्यांसारखे भुंकत नाहीत. शिकारीदरम्यान ते शिट्टीसारखा आवाज काढून एकमेकांना इशारे देतात. म्हणूनच यांना 'Whistling Dogs' असेही म्हणतात.