Coconut: महिलांनी नारळ का फोडू नये? तुम्हालाही हे कारण माहिती नसेल!

पुढारी वृत्तसेवा

हिंदू धर्मात नारळाला अत्यंत पवित्र मानले जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडूनच केली जाते.

पूजा असो किंवा नवीन गाडीची खरेदी; नारळ अर्पण करणे हे शुभ शकुन मानले जाते.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की पूजेचा नारळ नेहमी पुरुषच का फोडतात? महिलांना नारळ फोडण्यास का मनाई असते?

नारळाला 'श्रीफळ' म्हटले जाते. पौराणिक कथांनुसार, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी पृथ्वीवर नारळाचे झाड आणि फळ पाठवले होते.

शास्त्रांनुसार, नारळ हे सृष्टीचे 'बीज' मानले जाते. या बीजातूनच नवीन निर्मिती किंवा अंकुर फुटतो असे मानले जाते.

महिलांना निसर्गाने जननी (माता) बनवण्याचे वरदान दिले आहे. त्या स्वतः एका नव्या जीवनाला (बीजाला) जन्म देतात.

शास्त्रांनुसार, नारळ फोडणे म्हणजे बीजाचा नाश करण्यासारखे आहे. महिलांनी नारळ फोडल्यास त्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या गर्भाशयावर होऊ शकतो, अशी मान्यता आहे.

असे मानले जाते की, महिलांनी नारळ फोडल्यास त्यांच्या संततीच्या आयुष्यात किंवा आरोग्यात अडथळे निर्माण होऊ शकतात.

नारळावर माता लक्ष्मीचा पूर्ण अधिकार मानला जातो. त्यामुळे सन्मान म्हणून महिलांनी स्वतः नारळ न फोडता तो अर्पण करावा, असे सांगितले जाते.

धार्मिक श्रद्धा आणि आरोग्याच्या दृष्टीने महिलांनी नारळ फोडणे वर्ज्य मानले गेले आहे. ही परंपरा आजही हिंदू धर्मात पाळली जाते.