पुढारी वृत्तसेवा
जगभरात कुठेही गेलात, तरी वाईनची स्टँडर्ड बाटली ७५० मिलीलीटरची असते. पण असं का? यामागे इतिहास, व्यापार आणि मानवी सवयी जोडलेल्या आहेत.
पूर्वीच्या काळी काच फुंकणारे कारागीर एका श्वासात साधारण ७५० ml आकाराचीच बाटली तयार करू शकत होते. त्यांच्या फुफ्फुसांच्या क्षमतेवरून हा आकार ठरला, असे मानले जाते.
दुसऱ्या एका विचारप्रवाहानुसार, ७५० ml वाईन म्हणजे साधारण ६ ग्लास वाईन होते. एका व्यक्तीला जेवणासोबत पिण्यासाठी एवढी वाईन पुरेशी मानली जात असे.
शतकांपूर्वी फ्रान्स ब्रिटनला वाईन निर्यात करायचा. फ्रेंच लोक 'लिटर' वापरायचे तर ब्रिटिश 'इम्पेरियल' मोजमाप. ७५० ml मुळे दोन्ही देशांना हिशोब करणे सोपे जायचे.
७५० ml च्या बाटलीमध्ये वाईनचे प्रमाण आणि बुचाखाली राहणारी हवा (ऑक्सिजन) यांचे संतुलन उत्तम राहते. यामुळे वाईनाचा दर्जा दीर्घकाळ टिकून राहतो.
उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या मते, ७५० ml चा आकार वाहतुकीसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आणि हाताळण्यास अत्यंत सोपा आहे.
७५० ml व्यतिरिक्त 'हाफ बॉटल' (३७५ ml) असते, जी स्वीट वाईनसाठी वापरतात. तर 'मॅग्नम बॉटल' (१.५ लिटर) ही दोन स्टँडर्ड बाटल्यांच्या बरोबरीची असते.